- अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२१) :- व्यवसायासाठी पाईपची गरज असल्यामुळे फिर्यादीने २ लाख १४ हजार ४८० रुपये किमतीचे २ हजार ६५३ किलोचे पाईप घराजवळ आणून ठेवल होते. अज्ञात चोरट्यांनी ते चोरून नेले.
हा प्रकार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पिंपरीगाव येथे घडला. कुणाल मंगेश सातव (वय ३५, रा. सातव निवास, पिंपरीगाव) यांनी मंगळवारी (दि. २८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















