न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- “दिवंगत श्री लक्ष्मीचंद आर्य” यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. २७) रोजी लक्ष्मीचंद आर्य समाज कल्याण फाउंडेशनतर्फे लक्ष्मीचंद आर्य क्लिनिक, रुपीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये रक्दान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.
निगडीमधील रुपीनगर येथील लक्ष्मीचंद आर्य क्लिनिकमध्ये वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार विनामूल्य उपलब्ध करून दिले जातात. कर्मचारी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
यावेळी संकलित केलेले रक्त पिंपरीमधील पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या वायसीएम या सरकारी रुग्णालयाला दान करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजपाल आर्य यांनी दिली.
















