- तिऱ्हाईताशी प्रियेसीचे सुत जुळल्याच्या संशयातून प्रियकराने काढला काटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२१) :- प्रियकराला डावलून इतर एकासोबत महिलेचे संबंध सुरू असल्याची कुणकुण पहिल्या प्रियकराला लागली. त्या प्रियसचा प्रियकराने खून केल्याची घटना भोसरीत घडली आहे.
कलावती उर्फ कल्पना धोंडिबा सुरावार (वय ३८) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने पाच वर्षांपूर्वी याच महिलेने आपल्या प्रियकराला सोबत घेऊन पतीचा खून केला होता.
मयत महिलेच्या पहिल्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाजीराव विश्वास साबळे असं पहिल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे. त्याला मुंबईमधील नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे.