- तडीपार आरोपीची पिंपरी पोलिसांना धमकी अनं शिवीगाळ; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२१) :- आरोपीला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असताना तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच आरोपी शहराच्या हद्दीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले असताना आरोपीने कोयता जवळ बाळगून पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत झटापटी केली.
कोयता हातात घेऊन ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ असे म्हणून पोलिसांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ‘आज दिवस तुमचा आहे. उद्या काय करणार. तुम्हाला मीच पुरा पडणार’ असे म्हणून शिवीगाळ करून पोलिसांना धमकी दिली.
अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय २८, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक शहाजी धायगुडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.