- स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२१) :- कुदळवाडी आणि चिखली प्रभाग क्र.१ मध्ये मनपा स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकाराने शिवांजली सखी मंच यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या निमित्ताने पाककला प्रशिक्षण वर्ग, सामाजिक पुरस्कार, आरोग्य जनजागृती मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सोशल डिस्टंस्सिंग आणि मास्कचा वापर करून नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक दिनेश यादव फाऊंडेशन आणि मित्र मंडळाने केले आहे.
दिनेश यादव यांच्यातर्फे लसीकरण केंद्र, आधार केंद्र, कोरोना काळात करण्यात आलेली मदत आणि नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबाबत असलेल्या समाधानाने त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला आहे. बाकी नेतेमंडळी आपल्याला कामे न करता जनता आपल्याला पसंत करत असल्याचा फाजील आत्मविश्वास बाळगत असताना गेली अनेक वर्षे नागरिकांचा संपर्क,मनमिळाऊ स्वभाव,नागरिकांच्या समस्या सोडवायला दिनेश यादवांची असलेली तत्परता यामुळे त्यांच्याबाबत कमालीचे समर्थन या भागात बघायला मिळत आहे.
पुढील काळात चिखली भागात विकासाचे नवीन पर्व तसेच सुनियोजित पद्धतीने नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवायला आपण प्राधान्य देणार असल्याचे दिनेश यादव यांनी स्पष्ट केले आहे.