- आंतरात्म्याची साद म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना – डॉ. संभाजी मलघे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आंतरात्म्याची साद म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. संभाजी मलघे.
तळेगाव दाभाडे (दि. १८ जाने.) :- राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे आंतरात्म्याची साद होय. सेवा हे व्रत विद्यार्थ्यांनी मनापासून स्वीकारले पाहीजे, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर नुकतेच उकसान (ता.मावळ) येथे संपन्न झाले. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, सरपंच सोपान आढाव, उपसरपंच तानाजी शिंदे, बाळासाहेब शिंदे, पोलिस पाटील सुष्मा शिंदे, प्रा. डॉ. विजय खंदारे, डॉ. मधुकर देशमुख, प्रा. के. व्ही अडसूळ, प्रा. ज्ञानेश्वर काकडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. संभाजी मलघे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी श्रम संस्काराबरोबरच आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे. त्याबरोबरच राष्ट्रसेवाही करावी. सुष्मा शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही एक राष्ट्रसेवा असून, स्वयंसेवकांनी या राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारावे, असे सांगितले. प्रा. के. व्ही अडसूळ यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. डॉ. मधूकर देशमूख यांनी आपल्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या आठवणींना उजाळा दिला. तानाजी शिंदे यांनी स्वयंसेवकांचे स्वागत करुन मार्गदर्शन केले.
प्रा. राजेंद्र आठवले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. सदाशिव मेंगाळ. प्रा. आठवले, प्रा. दिप्ती पेठे, प्रसाद डुंबरे, अमोल खैरे, सुनिता सातपुते यांनी केले, तर शिबीर यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक वसंत भोसले, राजेंद्र ढोरे, महादेव विरणक, जयंत गवारी यांनी सहकार्य केले.










