न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जाने.) :- दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानतर्फे मंगळवार, दि. २२ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान, पिंपरी गावातील भैरवनाथ चौक येथे ‘श्रीमद् भागवत कथा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे यांनी हि माहिती पत्रकार परिषदेत दिली. प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, चंद्रकांत गव्हाणे, चिंधाजी गोलांडे, जयवंत शिंदे, अण्णा कापसे आदी यावेळी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.











