- कोविडचे दोन्ही डोस घेऊन देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२१) :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळतेय. राज यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांना ताप देखील आल्याची माहिती मिळत आहे.
त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी करोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर सॅनिटायझेशन केलं जाण्याची शक्यता आहे.
त्यांच्यावर घरीच क्वारंटाईन होऊन उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.