- माजी. महापौर राहुल जाधव आणी मंगल जाधव यांचा स्तुत्य उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२१) :- प्रभाग क्रमांक ०२ जाधववाडी-चिखली-मोशी भागातील नागरिकांसाठी आ. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल जाधव आणी माजी महापौर राहुल जाधव यांच्या वतीने शनिवारी (दि. २३) आणी रविवारी (दि. २४) दरम्यान मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला.
यावेळी आशा आहेर, संभाजी घारे, महेंद्र मंडलिक, बाबु जाधव, गुलाब जाधव, नंदकुमार जाधव, बाबु वाळूजकर, चिंतामणी शिंदे, प्रताप भांबे आदी उपस्थित होते.
राहुल जाधव म्हणाले, कोरोनाच्या या काळात आणि वातावरणातील बदलामुळे लोकांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. रक्त तपासणीसाठी लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. लॉकडाउनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना हातभार लागावा यासाठी
या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभागातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.