- वाचा… काय म्हणाले आयुक्त?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- बेशिस्त वाहनावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे टोईंग मशिन वाहनाअभावी कारवाई होत नसल्याने ‘पे ॲण्ड पार्क’ योजना थंडावली आहे. पोलिसांना पालिका टोईंग वाहन पुरविणार आहे. त्यानंतर पुन्हा ‘ पे अॅण्ड पार्क ‘ योजना सुरू केली जाईल, असे पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
आयुक्त पाटील म्हणाले की, ‘ पे अॅण्ड पार्क ‘ योजना बंद केलेली नाही. टोईंग वाहन उपलब्ध नसल्याने वाहतूक पोलिसांना बेशिस्त वाहनांवर कारवाई करता येत नाही.
टोईंग वाहन खरेदी करून पालिका वाहतूक पोलिसांना पुरविणार आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्यानंतर ‘ पे अॅण्ड पार्क ‘ योजना पुन्हा कार्यरत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.