- पदाधिकाऱ्यांसह गटनेत्यांचाही कंपनीत समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) विभागासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. कंपनीत अधिकाऱ्यांसोबत महापौर, सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांचा समावेश असणार आहेत. या संदर्भातील उपसूचना सभेत मंजूर करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
सीएसआर विभागास सध्या वस्तूरूपात मदत मिळत असल्याने पालिकेच्या उपक्रम व योजनांसाठी खर्च करता येत नाही. विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी कलम आठ या कायद्यानुसार स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचे आयुक्तांच्या सूचनेवरून विभागांना प्रस्ताव दिला आहे. कंपनीची स्थापना झाल्यास सीएसआर विभागास दरवर्षी १५० ते १७५ कोटी निधी रोखीने महापालिकेस मिळेल, असा दावा विभागाने केला आहे.
सीएसआर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र एसपीव्ही कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आयुक्त असून, संचालक मंडळात ४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.