- अभ्यासक्रमाचे नूतनीकरण; साडेपाच कोटींचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- मोरवाडी येथील पालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
मोरवाडी आयटीआयमध्ये आजमितीला १४ ट्रेड शिकविले जात आहेत. १४ ट्रेडच्या ३६ तुकड्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी आवश्यक टुल्स किट, इक्विपमेंट, मशिनरी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्च होणार आहे.
त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. ६ कोटी ४२ लाख रुपये निविदा दर निश्चित केला होता. या निविदा प्रक्रियेत नवी सांगवीतील इंद्रनील टेक्नॉलॉजीस यांनी निविदा दरापेक्षा १४.१२ टक्के कमी म्हणजेच ५ कोटी ५२ लाख रुपये दर सादर स्वीकृत केला. हा दर लघुत्तम असल्याने निविदेला मंजुरी देण्यात आली.