- आरोपीची दुकान मालकाला आणि नोकराला दमदाटी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२१) :- आकुर्डी येथील स्वरूप वाइन्स नावाच्या दुकानात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आरोपी आला. मी आकुर्डीचा भाई आहे. तुम्ही मला फुकट दारू द्या, असे म्हणून दुकानातील दोन दारुच्या बाटल्या घेतल्या.
फिर्यादीने विरोध केला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानातील कामगार हा वाद सोडवण्यासाठी आला असता त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर जबरदस्तीने ३२० रुपये किंमतीच्या दोन दारूच्या बाटल्या आरोपी घेऊन गेला. विजय वाघमारे (रा. आकुर्डी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आदिनाथ हनुमंत गोरे (वय २५, रा. तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.