- कासारवाडीतील घटना; एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२१) :- आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीकडून गाडी घेण्यासाठी तसेच औषधोपचारासाठी पाच लाख ५० हजार ३१९ रुपये घेतले. ते परत न देता पैसे देण्यास टाळाटाळ करून विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना ऑगस्ट २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत बालाजी इंटरप्रायजेस, कासारवाडी येथे घडली. विशाल संपत कदम (वय ३५, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ४२ वर्षीय महिलेने सोमवारी (दि. १) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.