- रेल्वे खात्याच्या बनावट कागदपत्रांसह २६ लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२१) :- फिर्यादी महिला आणि आणखी चौघांकडून आरोपीने प्रत्येकी पावणे पाच लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या वडीलांकडून देखील आरोपीने हात उसने म्हणून दोन लाख २५ हजार रुपये घेतले. असे एकूण सहा जणांकडून आरोपीने २६ लाख रुपये घेतले.
त्यांना रेल्वे विभागात नोकरी न लावता भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट कागदपत्रांचा उपयोग करून फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना २८ जानेवारी २०२० ते १४ जानेवारी २०२१ या दरम्यान देहूरोड येथे घडली. राहुल धौलपुरीया असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ३५ वर्षीय महिलेने २ नोव्हेंबर रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.












