- भोसरीतील घटना; मुलाकडून बापाच्या विरोधात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२१) :- पत्नी मोबाईल बघत होती, त्याचा पतीला राग आला. त्याने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीच्या मांडीवर, पायावर, हातावर, छातीवर वार करून गंभीर जखमी केले.
हा प्रकार मंगळवारी (दि. २) सायंकाळी चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडला. दिलीप बाबुराव मोरे (वय ४५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचा मुलगा अक्षय दिलीप मोरे (वय २१) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












