- काळभोरनगर येथील घटना; आरोपी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२१) :- आकुर्डीतील काळभोरनगर येथे मोकळ्या जागेत १ नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मयताचा गळा आवळल्याचे वन होते. तसेच घटनास्थळी निरोधाचे पॅकेट व वापरलेले निरोध मिळून आले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. गोपनीय खबऱ्यामार्फत त्यांना या भागात देह विक्रीचा व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. अधिक तपासात दोन तृतीयपंथी रात्रीच्या वेळी थांबत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोन तृतीयपंथींना ताब्यात घेतले.
आरोपींनी मृताकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता गळा आवळून त्यांच्या खिशातून चार हजार रुपये काढून घेतले, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. बसराज भिमप्पा इटकल (वय ३८, रा. आनंदनगर, चिंचवड), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंजली बाळू जाधव (वय २५), अनिता शिवाजी माने (वय २६, दोन्ही रा. थेरगाव), असे अटक केलेल्या तृतीयपंथींचे नाव आहे.