न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जाने.) :- भीमक्रांती सोशल फाउंडेशन, हरोली यांच्या वतीने (दि. २०) रोजी देश व राज्य पतळीवरील विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ अशोक शीलवंत व सौ. कल्पना शीलवंत यांना आदर्श जोतिबा फुले व आदर्श सावित्री फुले पुरस्कारने नुकतेच जयसिंगपुर नांदनी ता शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रात उलेखनिया कार्यबद्दल देण्यात आला. हा पुरस्कार बाळासाहेब कांबळे दिलावर पटेल, मंगला कांबळे, अरुण कडाळे, आरपीआय नेते कुरुंडवाड यांचे हस्ते देण्यात आला. तसेच या कार्यक्रमप्रसंगी भंडारे, डी. एस. ढोने, विजितसिंह सरकार घोसरवाड बंड़ाजी माने, जी. प. सदस्य कोल्हापूर दीपक भोसले, जिल्हा उपाध्यक्ष आरपिआय सर्जेराव गायकवाड, सिने दिग्दर्शक विक्रम शिंगाडे, जिल्हा अध्यक्ष आरपीआय बेळगांव काकासाहेब करने, जेष्ठ नेते भारिप बहुजन महासंघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराला उत्तर देताना डॉ अशोक शीलवंत म्हणाले की, हा पुरस्कार मिळाल्याने काम करण्याची ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली आहे आणि यापुढे सामाजिक धार्मिक आर्थिक व शैक्षणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्याची हमी दिली व पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे व मान्यवारांचे आभार व्यक्त केले.











