न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २३ जाने.) :- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना मोहननगर शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शिवसेना मोहननगर विभागप्रमुख विशाल यादव यांच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच खिंवसरा अंधशाळेत फळे वाटप करण्यात आले.
यावेळी विभाग प्रमुख विशाल यादव, उपविभागप्रमुख मधुसुदन आंबुस्कर, शाखाप्रमुख नागेश नामदे, शशिकांत पाडाळे, गणेश शिंदे, सतीश चौधरी, संतोष धावडे, आकाश राजिवले आदी शिवसैनिक उपस्थित होते.











