न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२१) :- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आणि नेहरूनगर येथील पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माजी महापौर हनुमंतराव भोसले, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.












