न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २३ जाने.) :- गेल्या अनेक दिवसांपासून कुदळवाडीतील हर्षल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर महावितरणाचा विद्युत डीपी बॉक्स धोकादायक अवस्थेत उघडा आहे. या परिसरातील नागरिकांची लहान मुले, तसेच मोकाट जनावरे आदींचा या परिसरात वावर असतो.
त्यामुळे त्यांच्या जीवितास या उघड्या डीपी बॉक्समुळे धोका होण्याचा संभव आहे. याबाबत स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांना येथील परिस्थिती दाखवली व झाकण बसविण्याची सुचना केली. महावितरण अधिकारी गिते यांनी लवकरच डीपी बॉक्सला झाकण बसवण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.











