न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- घरकुल परिसरात जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव उपस्थित होते.
त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव करण्यात आला. समाजात शिक्षण, समता आणि बंधुभावाची मूल्ये रुजविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी सुरेश वैरागर, नरसिंग वैरागर, सतीश रिठे, अशोक भिसे, विलास गडसिंग, संदीप रोकडे, भगवान आढागळे, बजरंग जाधव, कीर्ती जाधव, रोहिणी रोकडे, अरुणा भोसले, मयुरी भोसले यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















