- पोलिसांनी सापळा लावून शिताफीने केले दोघांना जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२१) :- वाकड येथील भुजबळ चौकातील जुना जकात नाका येथे रविवारी (दि. २१) दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान दोघेजण प्रवासी बॅगेतुन गांजा घेऊन आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. बॅगेची तपासणी केली असता त्यात ७,५४,५७५ रुपये किमतीचा ३० किलो १८० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. \
बाळू महादेव वाघमारे (वय ३१, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड), रवींद्र प्रकाश घाडगे (वय २३, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड. मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) या दोघांवर एनडीपीएस ऍक्ट कलम ८ (क), २० (ब) (।।) (क), २९ नुसार गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.