- एकजण अटकेत दुसऱ्यावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२१) :- आरोपीने महिलेशी जवळीक साधली. त्याचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग केला. महिलेला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. जून ते २१ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान ही घटना घडली.
नागेश मधुकर राठोड (वय २१, रा. चिंचवड) याच्या विरोधात महिलेने तक्रार दिली असून आरोपीविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी घटना ही भोसरी परिसरात घडली. शुक्रवारी (दि. १९) रात्री फिर्यादी महिला त्यांच्या घरी पायी चालत जात असताना त्यांच्या मागून आलेल्या आरोपीने महिलेसोबत गैरवर्तन केले. फिर्यादी महिलेने भावाला बोलावण्याची धमकी दिली.
आरोपीने महिलेला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. फिर्यादी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनिकेत हिरालाल पेडगावकर (वय ३१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.