- पिंपरी चिंचवड शहर केंद्राच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिछाडीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२१) :- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी पुन्हा पिछाडीवर पडली आहे. सन २०२१ च्या स्पर्धेत पिंपरी चिंचवड १९ व्या स्थानी आहे. स्वच्छ भारत अभियानाचा निकाल शनिवारी (दि. २०) जाहीर करण्यात आल आहे. त्यात सन २०२१ च्या सर्वेक्षणासाठी १० लाख लोकसंख्येपेक्षा मोठे शहर असलेल्या एकूण ४ हजार ३२० शहरांत पिंपरी चिंचवडचा १९ वा क्रमांक आला आहे.
संपूर्ण शहरात १०० टक्के ओला व सुका कचरा वेगवेगळा स्वीकारला जात नाही. मोशी कचरा डेपो येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. शहरात अनेक ठिकाणी कचराकुंड्या कायम आहेत. शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. रस्त्यांवर व मोकळ्या जागेत कोठेही कचरा टाकला जातो. त्यामुळे शहराचे गुणांकन घटल्याचे दिसत आहे.
सर्वेक्षणात पहिल्या वर्षी सन २०१६ ला शहर देशात ९ व्या स्थानी होते. सन २०१७ ला शहर ७२ व्या क्रमांकावर फेकले गेले. सन २०१८ ला पिंपरी चिंचवड शहर ४३ व्या क्रमाकांवर आले. तर, सन २०१९ ला शहराने ५२ वे स्थान मिळविले. गेल्या वर्षी सन २०२० ला शहर २४ व्या क्रमांकावर होते.