- शहरातील नागरिकांना आयुक्तांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. योग्य कामांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे.
नव्या वर्षांचा अर्थसंकल्प बनविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामे सुचविण्याचे आवाहन नागरिकांना आले आहे. कामे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या मेलवर २० डिसेंबर सायंकाळी पाचपर्यंत पाठवावीत. पूल, उड्डाणपुल, नवे रस्ते, भवन बांधकाम आदी मोठी कामे नागरिकांना सचविता येणार नाहीत. दहा लाखर्चाची म्हणजे पदपथ, सायकल मार्ग, रस्ता डांबरीकरण, रस्ते दुभाजक किंवा दुरूस्ती, बसस्थानक, माहितीफलक नामफलक, बैठक व्यवस्था, रस्त्यावरील दिवे, वाहतूक नियंत्रक दिवे, इमारत दुरूस्ती, सार्वजनिक वाचनालय, पाणीपुरवठा ड्रेनेज, स्मशानभूमी, विर्सजन घाट, आरोग्य निरीक्षक केबिन, शौचालय मुतारी, कचराकुंड्या, कचराडेपो, कोंडवाडा, कत्तलखाना, गटर्स, नाला ट्रेसिंग व इतर अशी कामे नागरिकांनी सुचवावीत.
कामाचे स्वरूप व स्थान अचूकपणे लिहणे गरजेचे आहे. एका कामासाठी एक अर्ज करावा. कामाची निवड करताना प्रस्तावित जागेचा रिसतर ताबा, खर्च आदी आवश्यक बाबींची पूर्तता करूनच कामांचा अर्ज समावेश अर्थसंकल्पात केला जाईल. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.