- पत्रकार परिषदेत माहिती; स्पर्धेसाठी ३२ लाखांचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२१) :- हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१’ ही स्पर्धा ११ ते २२ डिसेंबर या काळात होणार आहे.
हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची घोषणा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांना निमंत्रण नव्हते.
पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे होणा-या स्पर्धेसाठी ३२ लाख २५ हजार ९७४ रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. या स्पर्धेची घोषणा बुधवारी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त आणि संबंधित संस्थेच्या पदाधिका-यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली. परंतू यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांना डावलण्यात आले असा प्रश्न ॲड. नितीन लांडगे यांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली.