न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- भूमकर चौक ते हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गातील धोकादायक यू टर्न वाहतूक विभागाने मंगळवार (दि. ३० नोव्हेंबर) रोजी बॅरिकेड्स लावून बंद केला आहे.
भूमकर चौकातून हिंजवडीकडे जायचे असल्यास याच मार्गाला लागून समांतर मार्ग आहे. त्या मार्गामधून वळसा घेऊन सुरक्षितरीत्या हिंजवडीकडे जाता येते. तसेच सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडीदेखील थांबविता येत असल्यामुळे या मार्गात बॅरिकेड्स ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली.