- वाहतूकदारांना मार्ग ओलांडण्यासाठी घ्यावा लागतोय वळसा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२१) :- बिजलीनगर येथील ओम चौक ते गुरुद्वारा चौक भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असून, येत्या पंधरा दिवसात वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती मिळतेय. सध्या मार्गिकेच्या भिंतीवर आकर्षक फरशी बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कामाला वेग मिळाला असून, सध्या जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
गेली दोन वर्षे निगडी – प्राधिकरण रावेतला जोडणारा मुख्य रस्ता या कामानिमित्त वाहतुकीसाठी बंद आहे. बिजलीनगर येथील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गुरुद्वारा चौकापर्यंत उभारण्यात येणाऱ्या अंडरपास रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अंडरपासमुळे बिजलीनगर रस्त्यावरील वाहतूक भुयारी मार्गाने वळती होणार असल्यामुळे मुख्य चौकात असलेल्या वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.
अंडरपासचे काम असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. मात्र अंडरपास झाल्यानंतर हा तिढा सुटणार आहे. मात्र, लवकरात लवकर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे.


















