- दोघे गंभीर जखमी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२१) :- पिंपळे गुरव येथील मोरया पार्कमधील एका खोलीत घरगुती वापराच्या सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येत होता. त्यावेळी गॅस गळती होऊन स्फोट झाला.
यात खोलीचा दरवाजा तुटून खोलीबाहेरील टेम्पोचेही नुकसान झाले. तसेच यात दोन जणांना दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोट झाला त्यावेळी खोलीत घरगुती वापराचे १० तर व्यावसायिक वापराचे पाच सिलिंडर होते. या सिलिंडमधून गॅस असुरक्षितपणे काढून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरण्यात येत होता. बुधवारी (दि. ८) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
















