न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २७ जाने.) :- शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर व मराठवाडा येथील निलंगा शहरातील राठोडा या गावी विविध उपक्रमाने ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले व प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राठोडा जिल्हा परिषदेतील शाळेत अनाथ मुलांना शालेय साहित्यांचे वाटप प्रसिद्धीप्रमुख दत्ता गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रेम सोमवंशी, पंकज जाधव, विनोद जाधव, अमोल जगताप, प्रदिप शेळके, किरण जाधव, विजय कवटकर, प्रशांत जाधव, सरपंच पंकज शेळके, उपसरपंच महेश सोमवंशी, बाबासाहेब सोमवंशी आदी उपस्थित होते.
तसेच शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने काळेवाडीतील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सार्वजनिक वाचनालय शिवसैनिक व उद्योजक विनायक पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करून, पेढे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, प्रदिप दळवी, नवनाथ जाधव, निलेश भेलके, भिमराव ढवारे, शिवाजी तेलंगे, नितीन येडके, सचिन घोलप, भिमराव कुलकर्णी, रविकिरण घटकार, आशिष वाळके, भारत गोडांबे, सतिष भवाळ, आतुल गाडवे, मारूती मस्के, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.











