न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जाने.) :- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आय.आय.एम.एस.) च्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ब्रिगे. डॉ. एस. के. अंबिके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वीरपत्नी रेखा सुर्यवंशी यांनाही स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याशिवाय संस्थेच्या वतीने ‘डोनेशन ड्राईव्ह’ या उपक्रमांतर्गत जमा करण्यात आलेले वापरण्यायोग्य कपडे व उपयुक्त वस्तू आदिवसी समाज बांधवांना देण्यासाठी चिंचवडच्या स्वामी विवेकानंद केंद्राच्या प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संचालक डॉ. मिलिंद मराठे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांच्यासह सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पवन शर्मा यांनी विशेष सहकार्य केले.











