- पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास ठरणार अखेरची महासभा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या गुरुवारी (दि. १६) आयोजित केली आहे. सभेसमोर पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी अनुदान देणे, जाहिरात होर्डिंगचे नवे धोरण, यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई, एकरकमी थकबाकी भरल्यास मिळकतधारकांना सलवत देणे हे प्रमुख विषय आहेत. सभा दुपारी दोनला होणार आहे.
महापालिकेची आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास ही सभा चालू पंचवार्षिकेतील अखेरीची ठरणार आहे. सभेसमोर एकूण १३ विषय आहेत. राज्य शासनाच्या सुचनेवरून महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, तसे नवीन धोरण आखले आहे. इंदोर शहराप्रमाणे शहरात जाहिरात होर्डिंगचे धोरण तयार केले आहे. मात्र, आयुक्तांचा हा प्रस्ताव विधी समितीने दप्तरी दाखल करण्याची शिफारस सभेकडे केली आहे.
गेल्या सभेत तहकूब केलेला शहराचे दोन भाग करून यांत्रिक रस्ते पद्धतान सफाई करणे. कराची एक रकमी थकबाकी ना विलंब दंडात सवलत देणे. चिखलीतील टीपी स्कीमसाठी दोन ठिकाणची जागा ताब्यात घेणे. जिजामाता रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया कक्षातील विद्युत व्यवस्थेसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास १ कोटी ७८ लाख ५५ हजार खर्चास प्रशासकीय मान्यता देणे. थेरगाव रुग्णालयासाठी विद्युत व वातानुकूलीत यंत्रणा, टेलिफोन कामासाठी ३ कोटी २५ लाख खर्चास प्रशासकीय मान्यता देणे. पीएमपीएलचे ११४ कर्मचारी महापालिका आस्थापनेवर वर्ग करणे. पीएमपीएलच्या भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्रात सीमा भिंत, डांबरीकरण, ड्रेनेज, सर्व्हिस पिटसह वर्कशॉप, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी कामासाठी अर्थसंकल्पात ३ कोटी निधीचे वर्गीकरण करणे. शहराबाहेर औंध येथील पशु संवर्धन विभागाच्या जागेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासस्थान, विश्रामगृह, वाहनतळ, उद्याग, गॅरेज, संरक्षण भिंत बांधण्यास प्रशासकीय मान्यता देणे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य भांडवली खर्चाच्या अर्थसंकल्पात नवीन कामे काढण्यासाठी तरतूद वर्ग करण्यास मान्यता देणे आदी १३ विषय सभेच्या विषयपत्रिकेवर आहेत.
















