न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २७ जाने.) :- प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नूर ए इमान सोशल तेहरीक (नीस्ट) च्या वतीने ध्वजारोहण आणि वकीलांच्या व्यवसायाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वकीलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ॲड. रघुनाथ सोनवणे तसेच प्रमुख वक्ते ॲड. प्रकाश मोरे उपस्थित होते. प्रस्ताविक नीस्टचे अध्यक्ष फिरोज चांदभाई शेख यांनी केले. स्वागत इसाकभाई शेख यांनी केले.
प्रस्ताविक करताना नीस्ट ही आपल़्या कार्याद्वारे समाजाला चांगला संदेश देणारी सामाजिक संस्था आहे, असे फिरोज शेख यांनी नमुद केले. नीस्टचे कार्य सर्वांसमोर मांडले. सर्व वकीलांचा सन्मान हा गौरवचिन्ह आणि शाल देऊन करण्यात आला.
याप्रसंगी भारत सरकार नोटरी ॲड. संपत भुजबळ, ॲड. प्रकाश नेवाळे, ॲड. सुदाम साने, ॲड. विशाल जाधव, ॲड. मृणाल मळेकर, ॲड. राकेश अकोले, ॲड. कृष्णा भांगरे, ॲड. मयुरी साने, ॲड. वर्षा मोरे, ॲड. योगेश लोखंडे, ॲड. गणेश गायकवाड, ॲड. विकास नेवाळे, ॲड. योगेश थंबा, ॲड. शिल्पा रोकडे, ॲड. खांडेकर, ॲड. नीता सय्याळ, ॲड. शुभांगी जैसवाल, ॲड. सुवर्णा साने आदि वकीलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विरोधी पक्ष नेते दत्ता साने, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेवक संतोष मोरे, नगरसेविका स्वीनल म्हेञे, स्वीकृत नगरसेवक दिऩेश यादव, मंगला राहुल जाधव, तसेच चिखली गावातील सर्व प्रमुख ग्रामस्थ उपस्थीत होते.
या कार्यक्रमात सर्वच वकीलांनी आश्वासन दिले की, चिखलीमध्ये लवकरच आम्ही मिळुन एक मोफत सल्ला केंद्र सुरु करु. समाजाप्रती बांधिलकी मानुन आम्ही हे काम करु. असे अध्यक्षीय भाषण ॲड. रघुनाथ सोनवणे यांनी केले.















