न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जाने.) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातुन गोर-गरीब कष्टकरी जनतेला सन्मानाने जगण्याचा अधिकारी दिला आहे. पिंपरीतील पथारी-हातगाडी धारकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लायसन्स दिले आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाने व्यवसाय करता आला पाहिजे, यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. परंतु, काही व्यापारी हे गोरगरीब पथारी धारकांना प्रतिस्पर्धी समजुन त्यांच्या विरोधात तक्रार करतात.
पथारी-हातगाडीधारक हे व्यापाऱ्यांचे प्रतिस्पर्धी नसुन, त्यांना पुरक आहेत. ज्या ठिकाणी पथारी हातगाडी धारक नाहीत, त्या ठिकाणचा दुकानदार व्यवसाय चालत नाही. याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पिंपरी येथील व्यापाऱ्यांनी गोर-गरीब पथारी हातगाडी धारकांना विरोध करू नये, असे प्रतिपादन कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पिंपरी येथे केले.
टपरी-पथारी हातगाडी पंचायत शगुन चौक येथे शाखा आयोजित २६ जानेवारी गणराज्य दिन आणि भारतीय राज्यघटना सन्मान समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. भारतीय राज्य घटनेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन पथारी धारकांचे प्रश्न समजुन घेतले.
यावेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, शहर अध्यक्ष रमेश शिंदे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, रिक्षा संघटनेचे पोपट तोरमल, मुकेश जाधव, घरकाम महिला अध्यक्ष आशा कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजन साठी आमर जस्वाल, सनी वाघमारे, विशाल साबळे, कलीमुदिन शेख, बशीर कुजारा, दशरध हिगके, किरण जस्वाल, सतिश वाघमारे, अशोक पडागळे, जुम्मन शेख, मुकेश नेवानी यआदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.















