- दोन दिवसांत काश्मिरी तरुणाला सहा महिने कारावासाची शिक्षा…..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२१) :- एक तरुण महिलेच्या घरात घुसला. ‘ तू मुझे बहोत पसंद हो, मेरी हो जाओ ‘ असे म्हणून गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांत पोलिसांनी तरुणाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने ४८ तासांत आरोपीला ६ महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली.
सुरेशकुमार मोहनलाल (वय २२, रा. वेताळनगर, चिंचवड, मूळ रा. जम्मू काश्मीर), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांनी या तरुणाचा तपास केला. सरकारी वकील साधना बोरकर यांनी प्रकरणाचा पक्षातर्फे युक्तिवाद केला.
पीडित महिला १० डिसेंबर रोजी घरात असताना आरोपी तिच्या घरात गेला. तू मुझे बहोत पसंद हो, मेरी होजाओ असे म्हणून त्याने महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने फिर्याद दिल्यानुसार चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दोषारोपपत्र सादर केले. महिला विनयभंग व अत्याचारविषयक गुन्ह्यांचे न्यायालयीन कामकाज जलद गतीने व्हावे यासाठी या गुन्ह्याचे कामकाज जलदगतीने करण्यात आले.
















