- आकुर्डीतील १९ पत्राशेड, मोशीतील नऊ बांधकामे उध्वस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून ” अ ” क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १४ व १५ येथील आकुर्डी रेल्वेलाईन लगत असलेल्या अनधिकृत पत्राशेडवर सोमवारी (दि. १३) रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अंदाजे १६००० चौ. फुट क्षेत्रफळाचे १९ अनधिकृत पत्राशेड पाडण्यात आले.
ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता संजय भोसले यांच्या अधिपत्याखाली, उप अभियंता विजय भोजने, कनिष्ठ अभियंता रमेश जिंतीकर व बीट निरिक्षक अ, ब आणि फ, एम एस एफ ६३, महानगरपालिका अतिक्रमण पथक, पोलीस पुरुष १५, पोलीस महिला १०, मजूर १५, जेसीबी ०५, मनपा कर्मचारी व मजूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
दुसरी कारवाई इ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ३ मोशी येथील क्षेत्रामध्ये नव्याने सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आज बुधवारी (दि. १५) रोजी करण्यात आली. या कारवाईत एकूण ९ अनधिकृत बांधकामे/आर. सी. सी. / बीट बांधकाम व पत्राशेड असे एकुण क्षेत्रफळ अंदाजे १५५५०.०० चौ . फुट पाडण्यात आली आहेत.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त जितेन्द्र वाघ, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता हेमंत देसाई यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण पथक, एम. एस. एफ. जवान ५४, पोलीस उपनिरीक्षक १, पोलिस पुरुष ४, पोलिस महिला २, मजूर २, जेसीबी ३, ब्रेकर १, पोकलेन १, डंपर १ ,मनपा कर्मचारी व मजूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
















