- सहा जणांसह गॅस एजन्सी आणि जागा मालकांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२१) :- घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅसची चोरी करताना पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडले. याप्रकरणी जागा मालकासह एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (दि. १४) सकाळी उघडकीस आली.
बालाजी मलप्पा वाघे (वय ३१, रा. रहाटणी), धनराज मलप्पा वाघे (वय २८, रा. रहाटणी), सुरेश राजकुमार म्हेत्रे (वय २५ रा. रहाटणी), चालक काकासाहेब साहेबराव मिसाळ (वय ४९ रा. वेताळनगर, चिंचवड), अतिष अंबादास कसबे (वय २८, रा. रहाटणी चौक, रहाटणी), चालक शुभम रघुनाथ गवळी (वय २७ रा. पवनानगर, रहाटणी), वंदना गॅस एजन्सी, गुरुप्रसाद इंण्डेन गॅस एजन्सीचे मालक आणि जागेचा मालक कोकणे अशी गुन्हा दाख झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सामाजिक सुरक्षा पथकातील महिला पोलीस नाईक वैष्णवी विजय गावडे (वय ३५) यांनी मंगळवारी (दि. १४) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथील आदित्य गॅस एजन्सी येथे ही गॅस चोरी केली.
















