- अज्ञात तिघा जणांविरोधात वाकड पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२१) :- मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची गुरुवारी (दि. १६) रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात तिघा जणांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
काळेवाडी भागात मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ राहतात. त्या महानगर पालिका निवडणूक लढवण्यास अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा वावर त्या परिसरात वाढला आहे. रस्त्याच्या कडेला त्यांनी पार्क केलेली मोअज्टाञात र आज पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. यात, त्यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. वाहनाची तोडफोड करताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.
















