न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२१) :- महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी (दि. १७) रोजी दुपारी चारच्या दरम्यान घडली आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आत्महत्या करण्याच्या तयारीतील व्यक्तीला लायटरसह ताब्यात घेतले. ही व्यक्ती वायसीएम रुग्णालयात डॉक्टर असल्याची माहिती मिळतेय. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















