- भरधाव कारने घेतला होता सात वर्षीय मुलाचा जीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२१) :- काळेवाडी फाटा येथून रस्त्याने पायी चालत जात असताना बुधवारी (दि. ८) पहाटे साडेचारच्या सुमारास पुण्याकडून सर्व्हिस रोडने भरधाव वेगात आलेल्या कारने एका कुटुंबाला पाठीमागून जोरात धडक दिली होती. या धडकेत संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातानानंतर मोटार चालक थांबला नाही, तो काही अंतरावर जाऊन थांबला आणि मोटारीला काही झालं आहे का? हे पाहात असल्याचा सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळालं. अपघात पहाटे झाला असल्याने सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत नव्हते.
त्यामुळं मोटारीचा एका बाजूला आरसा फुटला होता यावरून आणि इतर सीसीटीव्हीचा आधार घेऊन आरोपीपर्यंत वाकड पोलीस पोहचले. आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी वाकड पोलिसांना १०० सीसीटीव्ही तपासावे लागले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तेजस शशिकांत बारसकर (वय १९) याला अटक केली आहे.















