- शहर राष्ट्रवादीकडून कर्नाटक घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२१) :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरातील श्री. शिव-स्मारक प्रतिष्ठान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतर पाटील यांनी कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व महाराजांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करण्याचे आवाहन केले होते.