- शहरातील दहा ओमिक्रॉन बाधित रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. १९) रोजी ओमिक्रॉन बाधित एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण शहराबाहेरील रहिवासी असून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल असून प्रकृती स्थिर आहे. यापूर्वीचे १० ओमीक्रोन रुग्ण घरी सोडण्यात आले असून गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे.
एकूण ४० कोविड १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ९ रुग्ण नवीन भोसरी रुग्णालय येथे व ३ रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. या सर्वांची प्रकृती स्थीर आहे. २८ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाश्यांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ ओमिक्रॉन ‘ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित ( Mutation ) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांचे देखील क्षेत्रिय कार्यालयस्तरावर सर्वेक्षण सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.