न्यूज पीसीएमसी नेटवर्क : हिंजवडी :- हिंजवडी येथील शिवाजी चौकातील वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि विनाअडथळा चालु ठेवण्यासाठी शिवाजी चौक ते विप्रोसर्कल फेज१ ते जॉमेट्रीक सर्कल चौक ते शिवाजी चौक अशी चक्राकार एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. चक्राकार एकेरी वाहतूक चालू ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना (पोलिस वाहने, ऍम्ब्युलन्स व आग्निशामक दलाची वाहने व्यतिरीक्त) खालील प्रमाणे प्रायोगीक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी पुर्वीचे काही पार्किंग निर्बंध असतील ते रद्द करण्यात आले आहेत.
- शिवाजी चौकातुन डावीकडे वळून विप्रोसर्कल फेज-१ येथुन उजवीकडे वळून जॉमेट्रीक सर्कल चौक येथून सर्व प्रकारच्या वाहनांनी इच्छित स्थळी जावे.
- शिवाजी चौकातुन उजवीकडे वळण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
- भूमकर चौकातुन शिवाजी चौकाकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व वाहनांनी शिवाजी चौकातून सरळ विप्रोसर्कल फेज१ येथून इच्छित स्थळी जावे.
- माणगांव रोडवरून विप्रोसर्कल फेज-१ चौकातुन शिवाजी ओकाकडे सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्या सर्व वाहनांनी डावीकडे वळुन जॉमॅट्रिक सर्कल येथून इच्छित स्थळी जावे.
- मेझा-९ चौकातुन सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या सर्व प्रकारच्या वाहनांनी डावीकडे वळुन शिवाज बीकातुन इच्छित स्थळी जावे
- फेज-२ ५ फेज-३ कडुन येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना जॉमेट्रीक सर्कल चौकातुन उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या सर्व प्रकारच्या वाहनांनी सरळ शिवाजी चौकातुन इच्छित स्थळी जावे.
नागरिकांनी याबाबत आपल्या काही सुचना असल्यास, त्या पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलिस आयक्तालय, ऑटोक्लस्टर, सायन्स पार्क समोर, पिंपरी, पुणे-१९ यांचे कार्यालयात दिनांक ३ ते ९ सप्टेंबर पर्यंत लेखी स्वरूपात पाठविण्यात याव्यात असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांच्या कडून मिळालेल्या सूचना व हरकती यांचा विचार करून याबाबत अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.












