- जवळील ऐवजही लुटला; अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२१) :- पिंपरीतील आंबेडकर चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने मंगळवारी पहाटे तीनच्या दरम्यान फिर्यादी जात होते. त्यावेळी एम एच १४/ २७१४ (पूर्ण नंबर माहिती नाही) या क्रमांकाच्या रिक्षात बसलेल्या पाच जणांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली.
त्यातील एकाने फिर्यादीच्या हातावर ब्लेड मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम, पाकीट, मोबाईल, जॅकेट असा एकूण एक लाख ४० हजारांचा ऐवज आरोपींनी दरोडा टाकून चोरून नेला.
फय्याज राशद शहा (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अज्ञातांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल दाखल केला आहे.