- आज ८० कोरोना रुग्ण; ६७ डिस्चार्ज, एकाचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ३०) रोजी ८० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७८९८६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७४७४२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्रोनचे ०३ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. ०३ पैकी ०२ महिला, ०१ पुरुष आहे. या ०३ पैकी ०१ रुग्ण नायजेरिया येथुन आलेली असुन ०२ त्याचे निकट सहवासीत आहेत. पैकी नायजेरिया येथुन आलेल्या रुग्णाचा (दि.२८) रोजी कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील रुबी एलकेअर कार्डीयाक सेंटर येथे हृदय विकाराच्या झटक्यामुळे (Anterior Wall Myocardial Infarction with ventricular tachycardia) मृत्यु झाला आहे. या रुग्णाचा ओमायक्रॉन पॉझिटीव्ह अहवाल आज प्राप्त झाला असुन रुग्णास ओमायक्रॉनची लागण प्रासंगीक निदान (Incidental finding) आहे. उर्वरीत ०२ रुग्ण नवीन भोसरी रुग्णालय येथे दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
एकूण ६१ कोविड- १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ४५ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.
















