- सांगवी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाने चार अनोळखी आरोपींना तोंडाला मास्क लावण्यासाठी सांगितले तसेच, ओळखपत्राची विचारणा केली.
त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच, डावा हात फ्रॅक्चर केला असे फिर्यादीत म्हटले आहे. शुक्रवारी (दि. ७) दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली.
अवदेश रामप्रसाद यादव (वय ३९) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चार अनोळखी मुलांविरोधात सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.