न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील सात अधिकारी व सात कर्मचारी, अशा एकूण १४ पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे.
कारोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका हिंजवडी पोलीस ठाण्याला बसला आहे. या पोलीस ठाण्यातील पाच अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या बाधित असलेल्यांमध्ये महिला अधिकारीही आहेत. इतर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वरिष्ठांकडून करण्यात आले आहे.