ठेकेदारावर कारवाई करा; विवेक तापकीर यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२१) :- रहाटणीतील साई मल्हार कॅालनीतील डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. कामाची पाहणी करून संबधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी साई मल्हार सोशल फांऊडेशनचे सचिव विवेक तापकीर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
हा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता. ठेकेदाराने डांबरीकरण फक्त सुशोभिकरणासाठी केले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पॅचेस आहेत. माल कमी पडला म्हणून मोठी डांबरखडी न अंथरता लहान खडीचे डांबरीकरण केले आहे.
अर्धवट रस्ता तयार करून मोठ्या खडीचे निम्मे डांबरीकरण केले आहे, असा आरोप तापकीर यांनी केला आहे. दोषी ठेकेदाराला आयुक्तांनी जाब विचारत कारवाई व्हावी, असे निवेदनात तपकीर यांनी म्हटले आहे.