- कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांना पालिकेचा टोला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- महापालिका प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्या पिंपरी भाजी मंडईमधील व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकतीच पिंपरी भाजी मंडईमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या व्यवसायिक व नागरिकांकडून ५०० रुपये दंड आकारला आहे.
पिंपरी भाजीमंडईमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक भाजी खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यात नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी मास्क व सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाहणी केली असता त्यांना भाजी मंडईतील १४ व्यापारी व नागरिक मास्क न लावता भाजीविक्री व खरेदी करताना दिसून आले.
त्यामुळे विक्रेत्यांकडून ५०० रुपयांचा दंड आकारला आहे. एकूण ७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुख्य आरोग्य निरीक्षक झिटे, आरोग्य निरीक्षक योगेश फले, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.